स्वामींच्या सेवेचे फळ नक्की मिळेल, काहीही झालं तरी स्वामींची सेवा सोडू नका…!!!
स्वामींच्या सेवेचे फळ नक्की मिळेल, काहीही झालं तरी स्वामींची सेवा सोडू नका…!!!
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी, भक्तहो नमस्कार.
श्री बाबा सबनीस हे अक्कलकोट मध्ये राहणारे, ते खूप छान तत्वाव्यक्ते होते आणि भाविक सुधा होते. त्यांच्या पत्नी चे देहांत झाल्याने ते ते एकटे राहून त्यांचे लक्ष कशातच रमत नव्हते. श्री बाबा सबनीस हे परमार्थ साधण्याच्या उद्देशाने हुमना बाद अवतारी पुरुष श्री मानिक प्रभू ह्यांच्या कडे जायचे. एके दिवशी स्वामी महाराज अक्कलकोट येण्यापूर्वी हुमाना बाद मधे माणिक प्रभू यांच्या भेटीस आले होते.
त्या वेळेला स्वामी सोबत त्यावेळेला आमच्या सोबत अजून दोन विभूती होत्या आणि नेमकी त्याचं दिवशी श्री बाबा सबनीस हे श्री माणिक प्रभू यांच्या दर्शनास आले, त्यांनी दर्शन घेतल्या नंतर श्री माणिक प्रभू यांनी श्री बाबा सबनीस यांना स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याची खूण केली. परंतु बाबा सबनीस यांना काही समजले नाही शेवटी, श्री प्रभू म्हणाले अतः पर हे स्वामी महाराज तुझे गुरू आहेत.
त्यांचे दर्शन घे..! श्री प्रभू असे बोलतच बाबा सबनीस आणि त्यांच्या सोबत असलेली दोन दिव्य मूर्तीचे दर्शन घेतले, त्या नंतर स्वामी महाराज एकदम चिडले आणि त्यांनी बाबा सबनीस यांना भरपूर शिव्या शाप दिले, अणि त्यांना बोलले की तू कसाई आहेस! इतकेच नव्हे तर त्यांच्या मनातील पुष्कळ गोष्टी अंत साक्षित्वाने ओळखून त्यांना ओळख पटवून दिली आणि शेवटी बोले अक्कलकोटकू जाव. हम भी आवेंगे! अस बोलताच बाबा सबनीस यांना आश्चर्य वाटले.
मी अक्कलकोट मध्येच रहाणारा आहे हे स्वमिना कसे समजले आणि आपली आई आजारी असताना तिने नको जाऊ सांगून सुद्धा मी इथे आलो आहे, आणि याचं मुळे त्यांनी सांगितले असेल की तू कसाई आहेस असे बोलले असावे. हा सर्व प्रकार बघून बाबा सबनीस यांना स्वामी महाराज अवतारी आहेत. याची खात्री पटली की हे साधारण स्वामी नाही आहेत.
बाबा सबनीस अक्कलकोट मध्ये आले आणि स्वामी सुद्धा कालांतराने अक्कलकोट मध्ये खंडेरावाचं देवळात येतात. अक्कलकोटमध्ये लीला करत. जेव्हा बाबा सबनीस स्वामींना बघतात तेव्हा त्यांना या प्रसंगाची आठवण येते आणि त्यानंतर श्री बाबा सबनीस हे स्वामींचे अनन्य भक्त बनतात, बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय!.
आजच्या लीले बद्दल मनन चिंतन केल्यानंतर स्वामी महाराज आपल्या आज असंख्य बोध देत आहेत, त्या पैकी बाबा सबनीस ह्यांची मानसिकता लक्षात घेता त्यांना दुःख होते. आणि यातूनच त्यांची ओळख अध्यात्माकडे लागली होती त्यांना मन शांती हवी होती आणि जीवनातील दुःखाच्या निमित्ताने हा मन शांतीच्या तळमळीचा प्रार्थना अप्रत्यक्ष का होईना.
त्यांच्या हृदयातून येत होत्या आणि बघा त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर येण्यास सुरुवात झाली. त्यांना उत्तम मार्गदर्शनासाठी अवतारी श्री माणिक प्रभू यांचा सहवास लाभला होता आणि श्री माणिक प्रभू यांनी श्री बाबा सबनीस यांची पात्रता तयार केले आणि जेव्हा योग्य पात्र तयार झाली तेव्हा स्वामी महाराज सगुण स्वरूपात त्यांच्या जीवनात आले.
स्वामीभक्तहो आजही आपल्या जीवनात असेच घडत आहे. आपल्या हृदयातून सुद्धा संकट दुःखाच्या निमित्ताने मला शांती हवी शांती हवी आहे मला यातून मुक्त व्हायचे आहे. अशा प्रार्थना निघत खरंतर ही प्रार्थना म्हणजे अप्रत्यक्षपणे स्वामींच्या निर्गुण-निराकार असीम अनंत स्वरूपाच्या दर्शनाची प्रार्थना आहे. आत्मज्ञान प्राप्तीची प्रार्थना आहे.
कारण आपले स्वामी परमानंदचे धाम आहे परमशांतीधाम आहे. आणि अशी प्रार्थना करतात सर्व सृष्टी लगेच आपली प्रार्थना पूर्ण होण्यासाठी कामाला लागते. आणि जसे बाबा सबनीस यांच्या जीवनात श्री माणिक प्रभू सारखे अवतारी विभूती शरीर धारी गुरु म्हणून आले. अगदी तसेच आपल्या जीवनात सुद्धा येतात. आपण त्या श्री गुरुंकडे जातो. आपली समस्या मांडतो आणि तेजस्वी गुरू आपल्याला त्या समस्येतून मुक्त सुद्धा करतात.
परंतु इथे गडबड होती. समस्येतून मुक्त झाल्यानंतर तात्पुरता आनंद येतो आणि हे सत्य मानून आपण पुन्हा मायेत अडकतो आणि त्या देह धारी श्रीगुरुंना विसरूनच जातो स्वामी भक्तहो अशा वेळेला आपल्याला त्या देह धारी श्री गुरूंचे चरण पकडून राहायचे आहे. कारण जर आपण त्या श्रीगुरूंची अनन्य भक्ती केली तर जसे आज झालेले माणिक प्रभूंनी बाबासाहेबांनी सांगितले.
स्वामी महाराज श्री गुरु आहे ओळख करून दिली अगदी तसेच हे देह धारी श्री गुरु आपल्याला परम ज्ञान देतात समज देतात आणि आपल्या अकलेच्या पोटामध्ये विवेक जागृत करतात आणि स्वामी महाराज यांनी आपल्या हृदयातच आहे याची ओळख करून देतात आणि एकदा की आपल्याला तर परमानंदाची ओळख झाली आपण त्याच्या प्रेमात पडतो.
या प्रेमालाच अनन्य भक्ती म्हणतात आणि मग संसार करत अडी अडचणी आल्या तरी हृदयातून स्वामी गुरूंचे मार्गदर्शन सतत मिळत असते त्या मार्गदर्शनाने आपण न डगमगता अगदी सहजपणे आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करतो थोडक्यात अक्कल्कोट कू जावो हम भी आयेंगे म्हणजे स्वामी कोण आहेत.
हा विवेक जागृत कर म्हणजे तुला परमानंद स्वरूप स्वामींचे दर्शन नक्कीच होईल या स्वामी वाणी ची नक्की प्रचिती येईल. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया हे समर्थ तुम्ही परमानंदाची अवस्था परम शांतीची अनुभूती आहे. तुम्हीच मुक्ती आहात हा विवेक जागृत करून देण्यासाठी तुम्ही जे शरीर धारी श्री गुरु माझ्या जीवनात पाठवले त्यांची मला ओळख करून द्या.
त्यांची भक्ती द्या जेणेकरून तुमच्या आणि माझ्या मध्ये असलेले अंतर कमी होईल मला तुमच्या असीम अनंत स्वरूपाची ओळख होईल आणि जशी मीरा तुमच्या प्रेमात वेडी झाली तुकोबा पांडुरंगाच्या भक्तीत दंग झाले अगदी तसे मी तुमच्या नामात दंग होईल आणि तुम्हाला अपेक्षित जीवनाची अभी व्यक्ती होईल अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!
मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईक सोबत शेअर करा.
सूचना – इथे शेअर केलेले लेख, माहिती ही सर्व सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पुष्टी करत नाही.
Comments
Post a Comment