कहानी जालंधर राक्षसाची
पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महा शक्तिशाली जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठविले. राहू कैलासावर गेला आणि त्याने जालंधरासाठी पार्वतीला मागणी घातली. ते ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून एक भीषण राक्षस निर्माण झाला. आणि राहू वर धावून गेला. त्या राक्षसाचे महाभयंकर रूप बघून राहू गर्भगळीत झाला. आणि त्याने शिवाच्या पायावर लोळणच घेतली. भोलेनाथांनी दूत बनून आलेल्या राहूला माफ केले. आणि राहूने तेथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले. पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती. त्याने भोलेनाथांना विचारले, की मी काय खाऊ? ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले "खा स्वतःलाच!" देवाधिदेव महादेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून राक्षसाने स्वतःला पायापासून खायला सुरुवात केली. आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले. तरीही त्याची भूक भागली नाही. महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त राक्षसाचे डोके! त्या राक्षसाच्या आज्ञापालनावर भोलेनाथ प्रचंड खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले *कीर्तीमुख*. प्रचंड भू