इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे १० फायदे

 इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे १० फायदे 




“रिटर्न फाईल केलेस का?”

काही दिवसांनी अनेक घरातून हा प्रश्न ऐकायला येईल. जून – जुलैमध्ये बहुतांश वेळा समस्त नवरे मंडळींना किंवा मुलांना हा प्रश्न विचारला जातो.


यावर “हो करतो”, “सीएना सांगितलय” अशी अनेक प्रकारची उत्तरं मिळतात.


“बघ हा नाहीतर आज-उद्या म्हणता म्हणता डेड उलटून जाईल. नेहमीचंच आहे तुझं हे. कसला सिरिअसनेसच नाही. डेड उलटून गेली तर पेनल्टी बसेल. त्यापेक्षा ऑनलाईन भरुन टाक ना पटकन. कितीसा वेळ लागतो?” असे अनेक सल्ले मिळाल्यानंतर मग रागाच्या भरात का होइना, पण पटकन रिटर्न फाईल केला जातो.


आजकाल अनेक कंपन्या आपल्या एम्प्लॉईजचा इन्कम टॅक्स आणि रिटर्न फाइल करण्यासाठी एखादी एजन्सी किंवा सी. ए. अपॉइंट करतात.


आयटीआर किंवा आयकर विवरणपत्रक म्हणजे काय? तो फाईल करणं बंधनकारक आहे का? त्याचे काय फायदे आहेत?


इन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१ नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स बद्दल असणारा एक महत्वाचा गैरसमज म्हणजे, अनेकांना वाटत की ज्यांचं इन्कम टॅक्सेबल नाही त्यांना रिटर्न्स फाईल करण्याची आवश्यकता नाही.

 निव्वळ नियम आहे म्हणूनच नाही, तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे अनेक फायदे आहेत. आजच्या लेखात आपण आयटीआर वेळेवर भरल्यामुळे होणाऱ्या १० फायद्यांची माहिती घेऊया.


१. कर्ज प्रक्रिया (Loan Processing): अगदी सर्वसाधारण गरीब माणसापासून मोठ्या उद्योगपतीपर्यंत सगळ्यांनाच आयुष्यात कधीना कधी कर्जाची गरज पडतेच. गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहनकर्ज अशी अनेक कर्ज घेताना अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.

 यासाठी मागील तीन वर्षांच्या इन्कम टॅक्स रिटर्नची कागदपत्रे हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे जे बहुतेक सगळ्याच बॅंकामध्ये लोन प्रक्रियेच्या वेळी द्यावे लागते.


२. क्रेडिट कार्ड प्रक्रिया (Credit Card Processing): क्रेडीट कार्ड च्या प्रोसेसिंग साठी इन्कम टॅक्स रिटर्न्स हे अतिशय महत्वाचे कागदपत्र समजले जाते. तुमचे रिटर्न स्टेटमेंट तुमच्या उत्पन्नाचा पुरावा (इन्कम प्रूफ) म्हणून वापरता येते.


३. विसा प्रकिया (Visa Processing): व्हिसा मिळवणं हे तसं कटकटीचं काम असतं. खूप सारी कागदपत्रे यासाठी गोळा करावी लागतात. व्हिसा प्रक्रियेमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न हे खूप महत्वाचे आणि आवश्यक असे कागदपत्र आहे.

 त्यामुळे वेळच्यावेळी जर रिटर्न भरलेले नसतील तर व्हिसा मिळविण्यात अडचणी येऊ शकतात.


४. टि.डी.एस रिफन्ड (TDS Refund): जर तुमच्याकडून फॉर्म १५G किंवा फॉर्म १५H भरुन द्यायचा राहिला असेल आणि टीडीएस कपात झाली असेल, तर कपात झालेली टीडीएसची रक्कम कुठल्याही बॅंकेकडून परत केली जात नाही. ही रक्कम परत मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आवश्यक आहे.


५. रहिवासी दाखला (Resident Proof): आजच्या घडीला सर्वात महत्वाचं कागदपत्र कुठलं असेल, तर तो रहिवासी दाखला. अगदी मुलांच्या शाळेपासून पासपोर्ट ऑफिसपर्यंत सगळीकडेच रहिवासी दाखला मागितला जातो. ‘आधार फॉर्म’ किंवा ‘पासपोर्ट ऑफिससाठी’ या दाखल्याचे नियम थोडे कडक आहेत. 

परंतू इन्कम टॅक्स रिटर्नची कागदपत्रे तुम्ही आधार कार्ड किंवा पासपोर्ट ऑफिसच्या कामासाठी रेसिडेंट प्रूफ म्हणून वापरु शकता.


६. गुंतवणूकी संदर्भातील माहिती: जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी, कार, म्युच्युअल फंड्स यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करता, तेव्हा त्याची माहिती आयकर विभागाकडे जात असते. रिटर्न्स फाईल करुन सदर माहिती तुम्ही आयकर विभागाला देणं बंधनकारक आहे.


७. अतिरिक्त कपात: टॅक्स भरताना जर काही गोष्टींसाठी एंप्लॉयर कडून कपात(deductions) केलेली नसल्यास रिटर्न भरुन ती त्रूटी दूर करता येते.


८. दंड आकारणी (Late Fee) : इन्कम टॅक्स रिटर्न उशीरा फाईल केल्यास त्याबद्दल दंड भरावा लागतो. इन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१ कलम १३१(१) नुसार ५०००/- ते १००००/- रकमेपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.


९. अतिरक्त व्याज: रिटर्न्स फाईल न केल्यास उर्वरित (बॅलन्स) टॅक्सवर अतिरिक्त व्याज १% प्रती महिना भरावे लागते.


१०. व्यवसायातील नुकसानाची वजावट मागणे (Carry Forward Of Losses): व्यवसायात झालेले नुकसान सात वर्षांपर्यंत पुढे ओढता येते किंवा पुढील नफ्यामधून वजा करता येते. यासाठी दरवर्षी रिटर्न्स फाईल करण आवश्यक आहे.


हे झाले आयटीआर भरल्यानंतर मिळणारे प्रमुख १० फायदे. पण आयटीआर फाईल करण्याचे अजूनही अनेक छोटे मोठे फायदे आहेत. जे प्रत्यक्ष अनुभवांमधून लक्षात येतात.


आयटीआर भरताना संपूर्ण आणि खरी माहिती भरुन फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे. तसे केल्यास आयकरासंदर्भात डिइ अगदी निश्चिन्त व्हाल. 

ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर डीजिटल सिग्नेचरच्या (सही) अभावी ITR V फॉर्म भरुन सबमिट करणं बंधनकारक आहे


Comments

Popular posts from this blog

मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका

डोळे येणे. डोळे आल्यास काय काळजी घ्याल?

कहानी जालंधर राक्षसाची