Maharastra Kesari | पृथ्वीराज पाटील विजयी

 

Maharashtra Kesari | हर्षद कोकाटेचा धक्कादायक पराभव, गादी विभागातून कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी







    यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज पाटीलने मानाची महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesri) गदा पटकावली आहे. पृथ्वीराजने थरारक झालेल्या अंतिम सामन्यात विशाल बनकरवर (Vishal Bankar) मात केली.

महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील(वय-२०) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला व ४५ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.

या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती.





Comments

Popular posts from this blog

मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका

डोळे येणे. डोळे आल्यास काय काळजी घ्याल?