स्वामींच्या आलेला अनुभव भाग 1
स्वामींच्या आलेला अनुभव भाग 1
🌷🌷II श्री स्वामी समर्थ II🌷🌷
*श्री स्वामींच्या चरणी रुजू केलेल्या रात्रसेवेमुळे कॉन्ट्रॅक्टर झालो*
प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मला यापूर्वी अनेक अनुभव आले. त्यापैकी एका अनुभवाची प्रचिती आपणासमोर मांडत आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील धामणगांव येथील मूळ रहिवाशी असून रोजगारासाठी नाशिक येथे १० वर्षांपूर्वी आलो. स्वामी सेवा मार्गात पत्नीमुळे आलो. कुटुंबात दोन मुले, मुलगी, पत्नी व मी केंद्रात स्वच्छतेपासून आरती व इतर कार्यक्रमांना उपस्थित राहून प.पू. गुरुमाऊलींच्या हितगूजासाठी वेळ मिळेल तेव्हा उपस्थित राहत असतो. विटा, माती उचलून गवंडीच्या मिस्त्रीच्या हाताखाली सांगतील ते काम करणे, थोडक्यात हमाली काम करणे,असे माझे कामाचे स्वरूप असे. एका रात्री रात्रसेवेसाठी दिंडोरी येथे रुजू झालो, तेव्हा खूप दिव्य मन:शांती मिळाली. तद्नंतर दुसऱ्या रात्रसेवेला गेलो असता, काही महिन्यातच मला बिल्डींग रो हाऊस बांधून द्यायचे काम मिळाले.
थोडक्यात ठेकेदार, कॉन्ट्रक्टर या पदावर माझी महाराजांनीच नेमणूक केली, असे मानतो. एवढेच नव्हे तर माझ्या हातात सध्या सहा बिल्डींग, रो हाऊस बांधण्याचे काम चालू आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात आवक वाढली आहे व उदर निर्वाह चांगल्या प्रकारे होत आहे. माझे कुटुंब खूप सुखी समाधानी आहे. तरी इतर सेवेकऱ्यांनी सेवेत सहभाग घ्यावा व आलेली प्रचिती इतरांना सांगावी, असे मी नम्रपणे नमुद करू इच्छितो.
*-श्री. नामदेव नवघरे, नाशिकरोड*
Comments
Post a Comment